देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण 97 .53 टक्के मतदान झाले . खर्डे विकास संस्थेच्या एकूण एकूण ८५२ मतदारापैकी एकूण ८३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला .
मतदान शांततेत पार पडले . कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .मतमोजणीला ४ वाजता सुरुवात झाली असून, तासाभरात निकाल हाती येणार असल्याने ,याची सभासदांना उत्सुकता लागून राहिली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम