खर्डे विभागात वीजपुरवठा सुरळीत करा प्रहार संघटनेची मागणी

0
12
खर्डेत वीजपुरवठा सुरळीत करावा,या मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे याना देतांना प्रहारचे कृष्णा जाधव समवेत दिलीप पाटील ,भरत देवरे,अशोक थोरात आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : खर्डेत उच्च नियमितपणे वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन गुरुवार ( 17 ) प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन विजवितरण कंपनीचे सहायक अभियंता जितेंद्र देवरे यांना देण्यात आले.

खर्डेत वीजपुरवठा सुरळीत करावाया मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे याना देतांना प्रहारचे कृष्णा जाधव समवेत दिलीप पाटील भरत देवरेअशोक थोरात आदी छाया सोमनाथ जगताप

निवेदनाचा आशय की ,खर्डे व परिसरात सध्या खूप कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे .उन्हाची तीव्रता बघता कांद्याला पाण्याची गरज असून,अनियमित वीजपुरवठा व तोही कमी दाबाने होत असल्याने पिके करपू लागली आहेत परिणामी शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या सप्ताहात अवकाळी पाऊस येऊन गेला आणि लगेच वातावरणात उष्णता निर्माण झाली त्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे .हे नुकसान टाळण्यासाठी कांदा पिकास पाणी देणे अत्यंत गरजेचे असते .परंतु वीज वितरण कंपनीकडून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने चार दिवसात एक एकर क्षेत्र देखील भिजत नाही .यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत .

याकामी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा ,या मागणीचे निवेदन गुरुवारी प्रहार संघटनेच्या वतीने सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे यांना देण्यात आले.यावेळी दिलीप पाटील ,भरत देवरे ,अनिल पवार ,अशोक थोरात आदी शेतकरी उपस्थित होते.

वाजगाव फिडर आणि शिवशी फिडर याच्यात विद्युत दाबामध्ये मोठा फरक दिसून येत आहे . वाजगाव फिडरवर अतिप्रमाणात लोड असून त्या तुलनेत शिव फिडरवर अत्यंत कमी लोड आहे. दोन्ही फिडरचा सारखा समतोल करावा .जेणेकरून वीजपुरवठा सुरळीत व उच्च दाबाचा होईल .
कृष्णा जाधव (खर्डे ) जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here