खर्डे विकास सोसायटी ५२ अर्ज वैद्य तर २ अर्ज अवैद्य ; ३० मार्च रोजी माघार

0
52

देवळा प्रतिनिधी : खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ( दि. १४ ) रोजी अंतिम दिवशी एकूण ५४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली .

या अर्जांची मंगळवारी (दि . १५ ) रोजी छाननी करण्यात आली असून ,यात दोन अर्ज अवैध ठरविण्यात आली. तर ५२ अर्ज वैध ठरविण्यात आली आहेत . यात सर्वसाधारण जागेसाठी (३६) अर्ज ,अनुसूचित जाती जमाती साठी( ३), महिला प्रतिनिधी साठी (६) , इतर मागास प्रतिनिधी( ५), भटक्या विमुक्त जाती जमाती (२ ) याप्रमाणे अंतिम उमेदवार यादी प्रशिध्द करण्यात आली आहे .

३० मार्च रोजी माघारीची अंतिम मुदत आहे . माघारीसाठी उमेदवारांची नमधरणी करण्यासाठी पॅनलच्या नेत्यांची दमछाक होणार असून , माघारीसाठी तब्ब्ल पंधरा दिवसांचा कालावधी असल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी पहाता निवडणूक बिनविरोध होते कि चुरशीची याचे खरे चित्र आता माघारीनंतर स्पष्ट होईल .इच्छुकांनी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे . यानिमित्ताने गावात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here