– सोमनाथ जगताप
देवळा : खर्डे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या सुविद्य पत्नी दीपाली कृष्णा जाधव यांची तर व्हा . चेअरमन पदी उत्तम भिका थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
खर्डे विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अत्यन्त चुरशीची झाली . या अटीतटीच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती बापू देवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने आठ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले तर संदीप पवार व विजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील गुरुदत्त पॅनलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानवले लागले . सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी बुधवार (दि ४) रोजी संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती .
यावेळी चेअरमन पदासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या सुविद्य पत्नी दीपाली जाधव यांचा तर व्हा . चेअरमन पदासाठी उत्तम थोरात यांचा निर्धारित वेळेत एक एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी या दोघांची बिनविरोध निवड घोषित झाल्याचे जाहीर केले . त्यांना सचिव विजय शिंदे यांनी सहाय्य केले .
या निवड प्रसंगी संचालक सर्वश्री रामदास नामदेव गांगुर्डे ,कारभारी पंडित जाधव ,वसंत लखा जाधव ,माधव रामदास ठोंबरे ,अनिल भाऊराव देवरे ,दातात्रेय वामन देवरे ,भरत बाबुराव देवरे ,सुभाष मुरलीधर मोरे ,जयश्री संदीप देवरे,संदीप अशोक पवार , युवराज बाबुराव मोरे उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला .
खर्डे विकास सोसायटीच्या स्थापनेनंतर प्रथमच दीपाली कृष्णा जाधव यांच्या रूपाने महिलेला चेअरमन पदाचा मान मिळाला आहे . दीपाली जाधव ह्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या सुविद्य पत्नी आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम