द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उत्तरप्रदेशात लखीमपूर मध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी( दि ११) रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खर्डे ता . देवळा येथील व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शवत प्रतिष्ठाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने नागरिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते . याला खर्डेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . यावेळी प्रहारचे कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार , बापू देवरे ,राष्ट्रवादीचे संदीप पवार ,शिवसेनेचे विजय जगताप आदींसह शेतकरी नानाजी मोरे ,भास्कर पवार ,दादाजी सोनवणे , रामदास बिरारी ,शिवाजी जाधव , हरी भगत व व्यावसायिक उपस्थित होते . महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम