देवळा ; खर्डे ग्रामपंचायतीच्या सन 2022-23 करिता आठवडे बाजार करवसुली लिलाव प्रक्रिया रद्द केलेली असतांना गावातील काही नागरिक श्रीराम मित्र मंडळच्या नावाखाली पावतीपुस्तक छापुण बळजबरीने व धाक दाखवुन हुकुमशाही पद्धतीने बेकायदेशिर कर वसुली करत आहेत .
ग्रामपंचायत प्रशासकाने याची दखल घेऊन ही बेकायदेशीर कर वसुली तात्काळ थांबविण्यात यावी ,अशी मागणी मुन्ना जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे . पत्रकाचा आशय असा की , खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2020 -23 करिता आठवडे बाजार ,मटण, चिकन आदी बाबींकरिता जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती . यातील आठवडे बाजाराची लिलाव प्रक्रिया काही कारणास्तव थांबविण्यात आली आहे . मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १ ९ ५८ नुसार ग्रामपंचायत हद्दितील कोणत्याही प्रकारच्या कर वसुलीचा अधिकार हा सर्वस्वी ग्रामपंचायतीच असतो .
ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी नसतांना छोट्या मोठ्या व्यावसायीकांकडुन बेकायदेशीर कर वसुली करुन एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या उत्पनाची चोरी होत आहे व शासनाची फसवणुक केली जात आहे . तरी सदर बेकायदेशीर चालू असलेली कर वसुली त्वरीत थांबवावी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी ,अशी मागणी पत्रकात केली आहे . पत्रकावर विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार , प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे , शिवसेनेचे विजय जगताप ,त्रम्बक देवरे,दादाजी जाधव,शशिकांत कोतकर ,संदीप जाधव ,गोरख जाधव ,शिवाजी जाधव,ताराचंद जाधव ,नानाजी मोरे ,संदीप जाधव,तुषार जाधव ,भूषण जाधव,निलेश पवार,काकाजी देवरे,नितीन आहिरे, महेंद्र निकम,लहू आहिरे,संजय मेने ,तुषार बोरकर,संदीप आहेर आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम