खर्डे प्रतिनिधी : खर्डे आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून डिलेव्हरीसाठी महिलेला दाखल करून घेतले नाही तसेच सिजर करावे लागेल अस सांगून देवळा येथे दाखल करण्यास सांगितले असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भूषण जाधव यांनी केले आहेत.
जाधव यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देऊन कैफियत मांडली आहे. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे, १५/१/२०२२ रोजी सायंकाळी ८. ३० मि. महिलेस रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो असता तेथे सानप मॅडम उपस्थितीत होत्या इतर कोणीही कर्मचारी हजर नव्हते त्यामुळे सदर सानप मॅडम यांनी सांगीतले की, पेंशटला मी अॅडमिट करून घेऊ शकत नाही. सिजर करावे लागेल, तुम्ही देवळा येथे अॅडमिट करा असे सांगितले व पेशंटला अॅडमिट करून घेतले नाही.
त्यानंतर मी पेंशट घेऊन देवळा येथील श्रध्दा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले व तेथे उपचार केले असता नॉर्मल डिलेव्हरी झाली, तरी सदर खर्डे प्रा.आ. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पेशंट अॅडमिट करून घेणेस असमर्थतता दाखविल्यामुळे रुग्णाची हेळसांड झाली व नाहक खर्च करावा लागला आहे. तरी सदर कर्मचारी व डॉक्टर यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व योग्य न्याय मिळावा असे पत्रात म्हटले आहे.
या सर्व प्रकारावर वैद्यकीय अधिकारी काय भूमीका घेता याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम