खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना निर्वाह निधी वाटप

0
58

देवळा प्रतिनिधी ; जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना निर्वाह निधी वाटप करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नातुन अपंग बांधवांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेऊन हा निधी दरवर्षी अपंग बांधवांसाठी रोख स्वरूपात वाटप करण्याचे शासनाने आदेश निर्गमित केले आहेत . यानुसार( दि ३)डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून खर्डे ग्रामपंचायतीने २१ अपंग बांधवाना निधीचे समान वाटप केले . यापूर्वी १३ अपंगांना लाभ दिला आहे .

प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिनानिमित्त तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात प्राथमिक आरोग्य केंद्रात अपंगांचे लसीकरण ,अपंग व्यक्तींना रेशनकार्ड वाटप ,वडाळा येथे मास्कचे वाटप ,वृक्ष वाटप व सत्कार आदी कार्यक्रम आयोजित केले होते .

यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव ,बापू देवरे ,भाऊसाहेब मोरे,शशिकांत पवार , हरिसिंग ठोके, समाधान शिरसाठ, बाळू बैरागी,अर्जुन देवरे, दशरथ पुरकर, नायब तहसीलदार विजय बनसोडे, प्रशासक प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here