द पॉईंट प्रतिनिधी: खर्डे ता देवळा येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असून, ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरओ प्लांटचे रविवारी( दि १५) ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशासक प्रशांत पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे ,यासाठी एटीएम आरओ फिल्टर प्लांटची उभारणी केली आहे.
ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना २०० रुपये किमतीचे कार्ड दिले जाणार असून, याद्वारे ५ रुपयात १८ लिटर शुद्ध साधे पाणी तर ८ रुपयात १८ लिटर थंड पाणी घेता येणार आहे. दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, तालुक्यातील बहुतांश गावात अशा प्रकारे आरओ प्लांट कार्यरत असून, याच धर्तीवर खर्डे ग्रामपंचायतीने नवीन आरओ प्लांटची उभारणी केली आहे. त्याचे रविवारी स्वातंत्र्य दिनी उद्घाटन करण्यात आले.
या सुविधेचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी सभापती बापू देवरे , माजी उपसरपंच राहूल देवरे ,ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जगताप , प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव , भाऊसाहेब मोरे,नानाजी मोरे , कारभारी जाधव, काकाजी देवरे ,संदीप पवार, माधव ठोंबरे , रामकृष्ण कुवर ,वैद्यकीय अधिकारी डॉ . अलका सपकाळे , तलाठी उमेश गोपनारायण , ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदिंसह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी,सदस्य व ग्रामस्थ ,कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम