खर्डे कांचन बारी रस्त्याचे काम सुरू ; नागरिकांनी व्यक्त केले समाधान

0
47
खर्डे - कांचेन बारी रस्त्याचे सुरू असलेले काम (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; खर्डे ते कांचने बारी रस्त्याच्या कामाला कणकापूर पासून पुढे सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खर्डे ते कांचने बारी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडली आहेत .

खर्डे – कांचेन बारी रस्त्याचे सुरू असलेले काम (छाया – सोमनाथ जगताप )

यामुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे . सदर रस्त्याचे काम मंजूर असून, निधीअभावी ते रखडले होते . या रस्त्याचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ राहुल आहेर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडे केली होती . याची दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे .

खर्डे परिसरातील ग्रामस्थांना कांचने बारी मार्ग नाशिकला जाण्यासाठी सोयीचा असल्याने तसेच शेतकरी पिंपळगाव बसवंतला कांदे व इतर शेतमाल विक्रीसाठी घेऊन जात असल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे . मात्र ,खराब रस्त्याअभावी वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती .

दरम्यान ,काम सुरू झाल्याने खर्डेसह , शेरी,वार्शी, कणकापूर, कांचेन, मुलुखवाडी ,वाजगाव , व वडाळा आदी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here