खर्डेत हनी बनी इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न

0
35
देवळा - खर्डेत हनी बनी इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतांना आयोजक

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; खर्डे (वा.) ता देवळा येथील हनी बनी इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये बुधवारी( दि २७)रोजी दिवाळी निमित्त युनियन बँक ऑफ इंडिया कळवण शाखेच्या वतीने रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली .

देवळा – खर्डेत हनी बनी इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतांना आयोजक

यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाच्या कळवण शाखेचे शाखा व्यवस्थापक धर्मराज चौधरी व मॅनेजर निलेश निकम , शाळेचे संचालक किरण जाधव, मुख्याध्यापक, तसेच, शिक्षिका, वैशाली जाधव , प्रियांका शिंदे, माहेश्वरी गवारे आदींसह कर्मचारी व पालक उपस्थित होते. यावेळी शाखा व्यवस्थापक चौधरी व मॅनेजर निकम आयोजित स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विध्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here