खर्डेत रामनवमी निमित्ताने श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ; यात्रेची जय्यत तयारी सुरू

0
12

सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : खर्डे ता देवळा येथे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने ( दिं १०) रोजी पारंपारिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ,श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून ह भ प भाऊसाहेब महाराज यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी प्रवचनाचा प्रारंभ करण्यात आला आहे .मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

खर्डे गावांत पारंपरिक पद्धतीने भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून भरली नव्हती . आता कोरोना आटोक्यात आल्याने व शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी नागरिकांना यात्रेचा आनंद लुटला येणार आहे . यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली असून, (दि १०) रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल . यानंतर रथाचा लिलाव होईल .

लिलावात भाग घेणाऱ्याला रथ मिरवणुकीचा मान दिला जाईल . संपूर्ण गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल .(दि ११) रोजी टांगा शर्यत , रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम व सकाळी हजेरी तसेच (दिं १२) रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . याचा खर्डे व पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here