
देवळा प्रतिनिधी : खर्डे ता देवळा येथे रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली . रामनवमी निमीत्ताने श्रीराम मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

रविवारी (१०) रोजी सकाळी ९ ते १२ ह भ प धनंजय महाराज ,मुंडेगावकर यांचे रामजन्मो त्सवानिमीताने काल्याचे कीर्तन झाले . रामजन्मोत्सवानंतर श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर ग्रेडिंब केली होती . सांयकाळी परंपरेनुसार रथाचा लिलाव करण्यात आला . प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ जाधव यांनी १५ हजार १ रुपयांना लिलाव घेऊन प्रथम रथ मिरवणुकीचा मान मिळविला . सजवलेल्या या रथाची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी महिलांनी रथाचे औक्षण करून दर्शन घेतले . राम नवीनिमित्ताने गावांत यात्रा भरते .
सोमवारी ( ११) रोजी रात्री ९ वाजता लोकनाट्य मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . मंगळवारी सकाळी तमाशा कलावंतांची मनोरंजन हजेरी होऊन , दुपारी ४ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे . अशी माहिती यात्रा कमिटीने दिली . दोन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्ताने गावात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातारण पसरले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम