द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ ते ७ डिसेंबर दरम्यान कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३३ हजार आहे.
मात्र, मुंबई करांचे क्रिकेट वेड लक्षात घेऊन ही मर्यादा ५० टक्के करण्याची मागणी होत आहे. या बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट प्रेमींच लक्ष लागले आहे.
दिवाळीसह सणा सुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी आणि नियम पाळण्याबाबतच्या बेफिकीरी मुळे दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज्यातील रुग्ण संख्या स्थिर असून रोज एक हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत.
राज्यात सध्या ९ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात १० कोटी ७७ लाख लस मात्र देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून उर्वरित निर्बंधही मागे घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्यातील कोरोना स्थिती सुधारल्याने आता उर्वरित निर्बंध हटवावेत अशी मागणी होत आहे.
बंदिस्त सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांना क्षमतेच्या ५० टक्के, तर खुल्या मैदानात किंवा स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थिती परवानगी देण्यात येण्यार आहे. या बाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याना सादर करण्यात आला असून त्यावर दोन चार दिवसांत निर्णय घेण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ पर्यंत तर उपहारगृह आणि बार रात्री १२ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र स्टेडियम आणि मैदानांवर निर्बंध खुली करून ५० टक्के मिळावेत या वर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
हे ही वाचा…. ‘बियरबार’ च्या रांगा रक्तदानासाठी लागल्यास देशात परिवर्तन – ना.बच्चू कडू
‘बियरबार’ च्या रांगा रक्तदानासाठी लागल्यास देशात परिवर्तन – ना.बच्चू कडू
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्राचे चुकीचे धोरण सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे केंद्राने कृषी कायदे मागे घेतले पण धोरणाचे काय असा सवाल करून आम्ही कच्चे तेल आयात केलं ते धीरूभाई अंबानी ने पक्के केलं आणि अंबानी साठी तेल आयात केलं पण शेतकऱ्याच्या घरावर तलवार चालवली तेल आयात केलं नसतं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता असा घणाघात करत या देशात विषमता वाढली आहे. विषमता वाढली तर बच्चू कडू भगतसिंग झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन निफाड येथील शहीद स्मारक लोकार्पण तसेच दिव्यांग शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम