कोरोना साथ नियंत्रनात ठेवण्यासाठी निफाड नगरपंचायत ऍक्शन मोड मध्ये

0
42

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निफाड नगरपंचायत परिसरात कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून शहरात कोरोना रुग्णांची वाढलेली रुग्ण संख्या लक्षात घेता निफाड नगरपंचायत ऍक्शन मोडवर येऊन शहरात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होऊ नये,यासाठी निफाड पोलिस व निफाड नगरपंचायत यांच्या कडून प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड शहरात आज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली यावेळेस विनामास्क कारवाईत 2500/-दंड आकारण्यात आला.

संबंधित व्यक्तीला कोरोनाचे नियम पाळले जावे असे हि सांगण्यात आले. निफाड शहरात दुकानात व बाजार मध्ये प्रतिबंधाचे प्लास्टिक वापरण्यावर हि कारवाई करण्यात आली असून 200/-दंड व 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहेत.

निफाड नगरपंचायत मा,मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिक, दुकानदार, भाजीपाला विक्रेते सह इतर व्यावसायिक यांना सूचना केली आहे की यापुढेही अशाच प्रकारे कार्यवाही सुरु राहील.तरी शहरातील व बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे,सामाजिक अंतराचे पालन करावे,सॅनिटायझर चा वापर करावा व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे.

मा.मुख्याधिकारी डॉ, श्रीया देवचके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक श्री गुलाबराव नवले,कर निर्धारण अधिकारी मोहिते,लिपिक राजेंद्र भवर, नरेश धारराव, राजू कापसे,विपुल सेन्द्रे,प्रमोद शिंदे,व निफाड पोलीस कर्मचारी आदींनी सदर कारवाईत सहभाग घेतला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here