स्वप्नील अहिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोरोना काळात डॉक्टर लोकांना आपन देवदूत समजत होतो आणी ते खरेही आहे, कारण त्यांनी कोरोना विषाणूशी सरळ सरळ लढाई केली पन खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पत्रकार, आरोग्य सेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनीही देवदूतासारखेच काम केले आहे.
आज त्यांचा सन्मान आपण करतो आहे याचे खरोखर कौतुक केले पाहिजे असे मत मविप्र चे अध्यक्ष व जलदूत डॉ. तुषार शेवाळे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील आराई येथे शिव शुंभू संघटना, आराई ग्रामपंचायत व सत्यादर्शी सोशल फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान सोहळाला संबोधित करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
समाजातील सर्व क्षेत्रातील जनता ही कोरोना ने होळपळली होती. एक एक करता करता अनेक जवळच्या मित्रांना आपन या काळात गमावले आहेत. याचे भान ठेवून अजूनही लग्न समारंभात हजारो लोक जमत आहे हे मोठे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कारण अजून कोरोना संपलेला नाही त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आराई गावात शंभर टक्के लसिकरण झाले आहे याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. गावात विकासाची गंगा दिसते आहे ती अशीच पुढे घेऊन जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील शिव शंभू संघटना, आराई ग्रामपंचायत व सत्यदर्शी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील पत्रकार, कोरोना वॉरियर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या वेळी आराईचे सरपंच मनिषा आहिरे, शिव शंभु संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, उपसरपंच अनिल माळी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधव अहिरे, सटाणा पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती आहिरे, ग्रामपंचायत सदस्य साधना आहिरे, देवूबाई माळी, शिव शंभू संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंद दाणी, कार्याध्यक्ष कैलास पवार, सत्यदर्षी फाऊंडेशन चे अध्यक्ष दिनेश पगार, सटाणा येथिल सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बच्छाव, वृक्ष मित्र रविराज बच्छाव, तंटामुक्तीचे नंदकुमार आहिरे, माधवराव आहिरे, बाबाजी सोनवणे, वसंत आहिरे, सुधाकर भामरे, दिलीप अहिरे, परशुराम अहिरे, भाऊसाहेब अहिरे, ग्रामसेवक एस बी भामरे, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, युवक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, गाव विकास समिती जिल्हाध्यक्ष स्वप्निल अहिरे, पुरोगामी पत्रकार संघाचे बागलाण तालुका कार्याध्यक्ष हिरालाल बाविस्कर, उपाध्यक्ष गणेश बागुल, पत्रकार विनायक इनामदार, दिनेश सोनवणे, पोलीस हवालदार हेमंत कदम, पोलीस पाटील कारभारी भदाणे, सरला आहिरे, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी कर्मचारी, कु.शाश्वती जाधव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तेजस अहिरे, ललित महिरे, गौतम गरुड, भाऊसाहेब अहिरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकमाचे सुत्रसंचलन प्रा. ललित खैरनार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पगार यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम