कोरोना पुन्हा वाढतोय ; WHO च्या इशाऱ्याने चिंता वाढली

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : जगात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे, चीन तसेच युरोपातील अनेक देशांत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भविष्यात जगावर पुन्हा एकदा करोनाचे संकट उभे राहत आहे. यामुळे चिंता वाढली असून काळजी घेणं देखील महत्त्वाचे आहे.

भारतात तूर्तास तरी नवीन व्हेरियंट आढळलेला नसला तरी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी नवीन व्हेरिएंट (New variant) कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अजूनही करोनाचे संकट टळलेले नाही. करोनाची लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला होता की, जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाची संसर्ग फैलावतोय. यामुळे विशेषतः भारताने (India) सतर्क राहिले पाहिजे. असा सल्ला देखील दिला आहे.

‘स्टिल्थ ओमायक्रॉन व्हेरिएंट’ सर्वात संसर्गजन्य असून तो चीनमध्ये (China) वेगाने पसरत असून. चीनमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. जानेवारी 2021 नंतर आता चीनमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही करोनाचे संकट टळलेले नाही. करोनाची लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे भारतीयांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here