कोरोना पुन्हा वाढतोय गेल्या 24 तासात 102 नवे रुग्ण

0
50

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 102 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona) आले आहेत. तर गेल्या चोवीस तासात 98 रूग्णांनी करोनावर मात केली. आहे जिल्हातील वाढती आकडेवारी पुन्हा चिंतेत भर घालणारी आहे.

आज जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 102 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या 50 इतकी आहे. आज ग्रामिण भागात 48 रुग्ण तर, जिल्हाबाह्य 04 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरी व ग्रामीण आकडेवारी जवळपास समान असल्याने प्रशासनाला दोन्ही ठिकाणी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

तर जिल्ह्यात आज 02 करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील 1 रुग्णाचा तर नाशिक शहरातील 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 8 हजार 8600 इतका झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here