देवळा प्रतिनिधी : देवळा शहरासह तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळांसह वाडीवस्ती व घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या कमी तर झालीच आहे, शिवाय कोरोनाचे सावट असल्यामुळे मोठ्या मंडळांनीही मिरवणुका न काढता श्रीगणेशाची स्थापना केली.
देवळा तालुक्यात यावर्षी फक्त सहा गावांत ‘एक गाव- एक गणपती’ उपक्रम राबविला जातअसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तालुक्यात २० सार्वजनिक मोठ्या मंडळांची नोंद झाली असून, एकूण फक्त २६ गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे.
दरम्यान, यातील विविध मंडळांनी आकर्षक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. देवळा पाच कंदील परिसर, पेठगल्ली व इतर चौकात गणेशमूर्तींची जोरात विक्री झाली. यावर्षी गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दिवसअखेर मुर्त्या शिल्लक राहिल्याचे चित्र दिसून आले. बालगोपालांसह युवावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता. पूजेचे सामान, नारळ, सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम