द पॉईंट नाऊ ब्युरो : कोरोनाचा आता अजून एक नवा प्रकार सापडल्याने सर्वांची झोप उडाली आहे. आत्ता आत्ता कुठे जग कोरोनाच्या भयंकर संकटातून सावरत असतांना, चीन मध्ये कोरोनाच्या सापडलेल्या या नव्या प्रकाराने आणि वाढत्या कोरोनाच्या प्रभावाने पुन्हा झोप उडवली आहे.
चीनमध्ये सध्या कोरोनाच्या पुन्हा वाढत्या प्रभावामुळे अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. आता इथे ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार सापडला आहे. यामुळे येथे एक प्रकारे हाहाकार माजला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने पुन्हा सर्वांची झोप उडवली आहे.
याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव हा चिनपासूनच सुरू झाला होता. आणि आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढल्याने जगाची चिंता वाढली आहे. भारतात तर आत्ता कुठे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र आता या नव्या संकटाने दारावर पून्हा टकटक केली आहे. यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेणे आवश्यक आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
सुरवात व शेवट चिनी मध्ये होवून करोना संपेल