कोरोनाची पाचवी लाट येणार : पण कोणत्या देशात?

0
18

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातील काहींना कोरोनावर मात करणं शक्य झालं तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला. तेव्हा जगभरातील विविध देशांनी आपल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन कोविड निर्बंध हटवले होते. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर होतं.

मात्र, आता पुन्हा काही देशांमध्ये कोरोना महामारीनं डोकं वर काढल्याचं चित्र दिसत आहे. फ्रान्समध्ये (france) कोरोनाच्या पाचव्या लाटेला (5th wave of covid19) सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन (French Health Minister Olivier Veran) यांनी यासंबंधी गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत कोरोना संक्रमण वेगाने होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे.

दुसरीकडे जर्मनीतही कोरोना पुन्हा एकदा बळावला असून गेल्या २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, भारतात आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ८५० रुग्ण आढळले आहेत. तसेच ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १२ हजार ४०३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट झाली असून देशात सध्या १ लाख ३६ हजार ३०८ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २७४ दिवसांतील हा नीचांक आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ३६ हजार ४८३ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here