द पॉईंट नाऊ ब्युरो : नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत मध्ये आज मतदान होत आहे. ओबीसी राखीव जागा वगळता सर्वत्र मतदान होत असून सहा तालुक्यांमध्ये तीनशे उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक भाजपातर्फे उमेदवारी करत आहेत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत शिवसेना मात्र तिस-या स्थानावर आहे. हा लोकशाहीचा उत्सव सकाळी साडे सात वाजेपासून सुरू होत आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात अनेक आमिषे दाखवली गेली दारू, मटण, पार्टी हा त्याचाच एक भाग आहे, काही राजकीय दलिंदरांनी पवित्र उत्सवाला बदनाम केले आहे, पाच ते दहा हजार रुपये प्रत्येकी मताची किंमत काही प्रभागात करण्यात आली आहे. हे अतिशय दुर्दैवी असून यात बदल घडणे अपेक्षित आहे. नागरिकांनी या लोकशाहीच्या उत्सवात प्रामाणिकपणे सहभागी व्हावे ज्यांनी पैसे वाटले तुमच्या मताची किंमत करण्याचा प्रयत्न केला अशा सर्व कपाळकरंटे नेत्यांना उमेदवारांना आपण धडा शिकवायलाच हवा, या शहराचा विकास आपल्याला अपेक्षित असेल तर तो उमेदवार किती सक्षम आहे याकडे लक्ष द्या. उमेदवार निवडून देऊन अभ्यासात्मक , विकासात्मक किती बोलणार हे मनी ठेवा. विकासाला खीळ बसणार नाही याची काळजी घ्या.
सकाळी मतदान करताना प्रत्येकाने आरशासमोर उभे राहावे व स्वतःच्या मनाला विचाराव आपण मतदान करताना सद्सद्विवेकबुद्धीने जाणार आहोत का ? आपण पैसे घेऊन तर नाहीना मतदान करणार, आणि पैसे घेतले असतील कोणी मतदारांनी तर थोडी तरी लाज बाळगा पण आपल्यामुळे प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या आपल्यामुळे शहराच्या विकासाला बाधा येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम