द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत असतांना शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यावर तोफ डागली आहे. केदा आहेरांना भाजप नेतृत्वाने पंतप्रधान करायला हवं कारण मोदी शहा यांच्या विरोधात देखील विरोधकांना सूचक मिळतात, मात्र यांच्या वॉर्डात मिळत नाही व मिळाले तर टिकत नाहीत याचा अर्थ यांचे कर्तृत्व मोठे आहे म्हणून यांना पंतप्रधान करायला हवं असा उपरोधिक टोला उदयकुमारांनी लगावला. त्यांच्या ह्या असल्या कर्तृत्वाची दखल घेवूनच त्यांना भाजपा नेतृत्व आमदारकीची उमेदवारी देत नाहीत. हेही सांगायला ते विसरले नाहीत.
केदा आहेर यांनी अनेक उमेदवारांना तिकीट देऊ असे आश्वासन दिले मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी इच्छुकांचा गळा कापला आहे, ऐनवेळी उमेदवार आपल्या पारड्यात खेचून त्यांनी रडीचा डाव खेळला आहे, यामुळे तालुक्यात लोकशाहीची हत्या झाली असून केदा आहेरांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी उदयकुमारांनी केली आहे.
सुचकांवर दबाव आणून त्यांना आपल्या बाजूला वळवले , विरोधकांना मैदानात नामोहरन करायचे असते, मात्र केदा आहेरांनी असे संकोचीत डाव टाकले याला राजकिय मुड्सद्देगिरी म्हणता येणार नाही तर हा लोकशाहीत जनतेचा केलेला विश्वासघात आहे. जनता हे कधीही विसरणार नाही.
तुमच्या राजकिय स्वार्थापोटी जनतेचा मतदानाचा पवित्र अधिकार हिरावला गेला, हे घातक आहे. विरोधकांना सूचक न मिळू देणे, उमेदवारांना आमिष दाखवून ऐनवेळी आपल्या पारड्यात घेणं हे दुर्दैवी आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा तालुका बनवायचा…..!
भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची ही पावती आहे, जनतेचे प्रेम असून विकासाला जनतेची साथ आहे, प्रत्येक वॉर्डात जनतेला वाटत की भाजपाची सत्ता असावी, या प्रेमापोटी स्वतःहून विरोधी पक्षातील उमेदवार आमच्याकडे येतात, मात्र लोकशाही जिवंत असली पाहिजे म्हणून ही निवडणूक होतेय, प्रत्येक वॉर्डात बिनविरोध निवडणूक होऊन भाजपचे उमेदवार यावेत ही जनतेच्या मनातील इच्छा आहे. गेल्या पाच वर्षे झालेली विकास काम, ही अभूतपूर्व आहेत, जनतेला ठाऊक आहे विकास कोण करू शकतो, सत्ता येते जाते, निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन विकास करणे गरजेचा आहे, तालुक्याचा कायापालट अपेक्षित आहे, संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा तालुका बनवायचा आहे असे केदा आहेर यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम