केंद्र सरकारने घेतला अतिशय महत्वपूर्ण निर्णय

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ;  पोस्टमार्टम (Post Morton) रिपोर्ट बाबत केंद्र सरकार (Central Government) द्वारे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता पोस्ट मार्टम रिपोर्ट संबंधितांना 24 तासात (24 Hours) केव्हाही उपलब्ध होऊ शकणार आहे.

भारतावर (India) इंग्रजांनी (British) 150 वर्ष राज्य केले. या कालावधीत त्यांनी अनेक प्रकारचे नियम (Rules) , प्रथा लागू केल्या. त्यातल्या काही आजही सुरू होत्या.

अशाच काही नियमांपैकी एक म्हणजे, पोस्ट मार्टम अर्थात शव विच्छेदन हे सूर्यास्ता नंतर करू नये. असा नियम इंग्रजांनी घालून दिलेला होता.

मात्र आता सद्य केंद्र शासनाने नवीन निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत आता मृत (Dead) पावलेल्या व्यक्तीच्या शवाचा शव विच्छेदन अहवाल संबंधिताच्या नातेवाईकांना 24 तासांच्या आत मिळणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) ट्विट करत, नवीन प्रोटोकॉल बाबत घोषणा केली. आता इंग्रज राजवटीच्या वेलीच्या नियमाचा काही एक संबंध नसेल.

आता जवळच्याच रुग्णालयात शव विच्छेदन केले जाणार आहे. याबाबत केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे.

आता ब्रिटिश कालीन व्यवस्था संपली. आता मोदींची नवीन गुड गव्हर्नन्स कल्पना आली आहे. असं ट्विट करता आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी या निर्णयाबाबत स्पष्ट केले.

कोणत्याही शवाचे विच्छेदन हे लवकरात लवकर व्हावे. अर्थात त्वरित केले जावे. जेणे करून अवयव दानासाठी प्राधान्य दिले जाईल.

म्हणजेच, कोणत्याही प्रकारचा शवाचा अवयवांचे दान करायचे असेल, तर त्यासाठी देखील विशिष्ट कालावधीच्या आतच संबंधित मृत शरीराच्या अवयवांचे दान केले जायला हवे.

केंद्र सरकारच्या या नवीन प्रोटोकॉल मुळे, आता शव विच्छेदन करता येत असलेल्या, रुग्णालया मधून 24 तासांच्या पोस्ट मार्टम रिपोर्ट उपलब्ध होईल.

अर्थात, आता रात्रीचे देखील शव विच्छेदन केले जाईल. आणि याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल.

केंद्र सरकार द्वारे घेण्यात आलेल्या, या निर्णया मुळे बऱ्याच बाबी सोप्या आणि सोयीस्कर होणार आहेत.

इंग्रज काळातील हा नियम बदलल्याने, आता 24 तासांच्या आत शव विच्छेदन अर्थात पोस्ट मार्टम रिपोर्ट उपलब्ध होईल.

केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने, अवयव दान या बाबीसाठी हा निर्णय खूप महत्वपूर्ण आणि फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे अवयव दान या बाबीस अधिक चालना मिळेल.

अर्थात, व्यक्तीच्या आपल्यातून गेल्या नंतर देखील, ती आपल्या अवयव दानाने आपल्या सोबतच कदाचित हे जग बघेल, ऐकेल, बोलेल.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here