केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात ;चांदवड येथे सर्वपक्षीय एकवटले

0
53

सुनील सोनवणे
द पॉइंट नाऊ प्रतिनिधी ; जनविरोधी कृषी कायदे, कामगार विरोधी श्रम सहायता व वीज दुरुस्ती विधेयक तसेच पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ मागे घेण्यासाठी आज चांदवड येथे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष,व किसान सभा यांचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली

यावेळी शिरीष कोतवाल व नितीन आहेर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर व नाकर्तेपणावर तसेच शेतकरी कृषी कायदे व कामगार विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. केंद्र सरकार आहे शेतकरी विरोधी असून जर शेतकऱ्यांना कायदे मान्य नाहीत तर ते तुम्ही लादण्याचा प्रयत्न का करतात?
हे सरकार फक्त जातीयवादाचे विष पेरत असून सरकारच्या धोरणांवर कोतवालांनी घणाघात केला

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना या कृषी कायद्याविरोधात जनजागृती करावी लागेल व प्रत्येक गावात जाऊन याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी तालुका दौरा आयोजित करण्याचा मनोदय शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केला.

चांदवड मार्केट कमिटी समोर रस्ता रोको करून
जनविरोधी कृषी कायदे कामगार विरोधी श्रम सहिता व वीज दुरुस्ती विधेयक मागे घेणे.

पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करणे बाबत.

शेतीमालाला उत्पादन आधारित बाजार भाव मिळण्यासाठी निर्यातीचे धोरण ठरविण्यात यावे

या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व पक्षांतर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. चांदवड पोलिस स्टेशन, पोलीस निरीक्षक बारवकर, चांदवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त केला

या रस्ता रोकोच्या प्रसंगी शिरीषकुमार कोतवाल, नितीन दादा आहेर, संजय जाधव, गणेश निंबाळकर, विलास भवर, संपतराव वक्ते, विजय जाधव, भीमराव निरभवणे, भीमराव जेजुरे, शहाजी भोकनळ, नंदू कोतवाल, भास्करराव शिंदे, परसराम निकम, कॉम्रेड राजाराम ठाकरे, कॉम्रेड अॅड. गुंजाळ, समाधान जामदार, राजाराम ठाकरे, प्रकाश शेळके, शिवाजी कासव, भावडू उगले, गुड्डू खैरणार, उत्तम ठोंबरे,काॅ. सारिका गुंजाळ, घमाजी सोनवणे, कॉ.तुकाराम गायकवाड, कॉ. गणपत गुंजाळ, वसंतराव देशमाने, दत्तू मामा ठाकरे, सोमनाथ पगार, सुनील ठाकरे, विजय गांगुर्डे यांचेसह शेकडो कार्यकर्ते रास्ता रोको साठी उपस्थित होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here