केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या रॅलीने भाजपाची जागा घटली ; मंत्र्यांचा करिष्मा ‘फेल’

0
66

कळवण प्रतिनिधी : कळवण नगरपंचायत निवडणूक अतिशय लक्षवेधी झाली यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी प्रतिष्ठिची केल्यामुळे निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागून असताना दीर, भावजयीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत विकासकामांच्या जोरावर आमदार दिराने केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभवाची धूळ चारली आहे. होमग्राउंड वर भारती पवारांचा करिष्मा मात्र चालला नाही उलट त्यांच्या रॅलीने भाजपाची एक जागा घटली असच म्हणावे लागेल. गेल्या वेळी भाजपाच्या 3 जागा होत्या तर यावेळी पवारांच्या रॅलीनंतर 2 जागांवर समाधान मानावे लागल्याने सोशल मीडियावर भारती पवार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यात.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत लक्ष घालून भाजपने १५ जागांवर उमेदवार दिले. त्यात भाजपच्या एका अधिकृत उमेदवाराने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मतदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

त्यानंतर झालेल्या निवडणुकीत १४ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. सुरवातीला विरोधकांनी ही निवडणूक काट्याची लढत होईल, असे भासवले. मात्र, मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहत अपवाद वगळता आघाडीच्या सर्वच उमेदवारांना शंभर ते अडीचशे मतांच्या मोठ्या फरकाने निवडून दिले. कळवण शेजारील देवळा तालुक्यात भाजपाने केदा आहेरांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली तर कळवण मध्ये भारती पवार स्वतः उतरून त्यांच्या जागा कमी झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

कळवण तालुक्यात कौतिक पगार यांच्या नेतृत्वाचे वेगळे वलय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची सूत्रे युवा नेते भूषण पगार यांनी आपल्या हाती घेत केलेले नियोजन, जनतेपुढे विकासाची ठेवलेली वचनपूर्ती, आमदार नितीन पवारांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे चित्रफीत आणि इतर माध्यमातून मतदारांपुढे ठेऊन मतदारांचा विश्‍वास संपादन केला. आघाडीतील सर्वच घटकांना सोबत घेऊन प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी भूषण पगार यांनी आखलेली व्यूहरचना यशस्वी ठरल्याने ‘पडद्यामागील किंगमेकर’ची भूमिका सर्वार्थाने यशस्वी ठरली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here