केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

0
13
देवळा ग्रामीण रूग्णालयत ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण करतांना ना डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तालुक्यातील उमराणे व देवळा येथील ग्रामीण रूग्णालयांसाठी मंजूर झालेल्या ऑक्सीजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

देवळा ग्रामीण रूग्णालयत ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण करतांना ना डॉ भारती पवार आमदार डॉ राहुल आहेर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी छाया सोमनाथ जगताप

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर होते. यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पुना गांडाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संभाजी आहेर, तहसिलदार विजय सुर्यवंशी, कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे, सहा.अधिक्षक विजयसींग पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा पडल्यामुळे प्रशासनाबरोबरच रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सीजन मिळविण्यासाठी दमछाक झाली. ऑक्सीजनची समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिनी पुढे येत कोविड केअर सेंटरला भेट दिलेली ऑक्सीजन मशीनमुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचले. येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देतांना रूणांना ऑक्सीजनचा तुटवडा पडू नये व ऑक्सीजन त्वरीत उपलब्ध व्हावा ह्या ऊद्देशाने देवळा व उमराणा येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आले आहेत.

यावेळी गटनेते जितेंद्र आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, ठेकेदार महेंद्र पाटील, भाजप तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण तसेच देवळा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हवेतून ऑक्सीजन जमा करणाऱ्या ह्या प्रकल्पात २०० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती होणार असून दररोज ५० ते ६० जम्बो सिलेंडर भरतील इतका ऑक्सीजन एका प्रकल्पातून मिळणार आहे. प्रकल्पासाठी ५२ केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले आहे. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात एकूण ३० ऑक्सिजन बेडची उभारणी करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here