मेष : / Aries Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करा. मनात एकाग्रता ठेवावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पैशांचा खर्च वाढेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. शुभ रंग – लाल.
वृषभ : / Tauras Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दाम्पत्यांमध्ये सुखाचे वातावरण असेल. धनलाभ होईल. उत्तम आहारामुळे शरीरात स्फूर्ती राहील. शुभ रंग – नारंगी.
मिथुन : / Gemini Horoscope Today: कुटुंबात तणावाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. मनात शंका निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. शुभ रंग – पांढरा.
कर्क : / Cancer Horoscope Today: दिवस शुभ आहे. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. मन स्थिर राहील. प्रवास सुखाचा होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात प्रगती होईल. शुभ रंग – निळा.
सिंह : / Leo Horoscope Today: मन अस्वस्थ राहील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. वायफळ खर्च करणं टाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग – पांढरा.
कन्या : / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे कल्पनाशक्ती वाढण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग – हिरवा.
तूळ : / Libra Horoscope Today: व्यापारी आणि विरोधकांशी स्पर्धा करू नका. कोणत्याही कामात यश मिळेल. आजारी व्यक्तींच्या तब्बेतीत सुधारणा होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. शुभ रंग – निळा.
वृश्चिक : / Scorpio Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवासा निमित्त बाहेर जाताना काळजी घ्या. कुटुंबातील आर्थिक व्यवहारामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल. सामाजिक जीवनात यश मिळेल. व्यापारात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग – लाल.
धनु : / Sagittarius Horoscope Today: मनात नकारात्मक विचार येतील. मन शांत ठेवा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची आराधना करा. कुटुंबात वादग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पिवळा.
मकर : / Capricorn Horoscope Today: नवीन कार्याची सुरुवात करताना काळजी घ्या. विघ्न येण्याची शक्यता आहे. कामा-धंद्यात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. विरोधकांशी वाद-विवाद घालू नका. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. शुभ रंग – निळा.
कुंभ : / Aquarius Horoscope Today: सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात पदोन्नती होईल. शुभ रंग – हिरवा.
मीन : / Pisces Horoscope Today: अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग – पांढरा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम