मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस साहित्य, लेखनासाठी उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होईल. स्वभावात आणि कामात चांगली प्रगती होईल. मनात शंका आणि भीतीचं वातावरण असेल. मानसिक संतुलनात प्रकृती चांगली ठेवावी लागेल. शुभ रंग – पांढरा.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी दिवस उत्तम आहे, कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. चांगल्या विचारांनी तुम्हांला स्फूर्ती मिळेल. खर्च वाढेल आणि आजारी असलेल्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल. शुभ रंग – हिरवा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तुमचा वेळ मनोरंजन आणि इतरांच्या भेटीगाठीसाठी जाईल. मित्रपरिवारांसोबत फिरायला जाऊ शकता. धनलाभ होईल आणि त्यासोबतच शुभवार्ताही मिळेल. व्यापारातील वेगमर्यादा वाढतील. जीवनशैलीत मान-सन्मान आणि कार्यात मोठे यश मिळेल. शुभ रंग – पिवळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कोणतंही शुभकार्य करण्याआधी सावध राहावं लागेल. तुम्ही खूप चिंतीत राहाल. कोणताही निर्णय घेण्याआधी टाळा, जेणेकरून तुम्हांला कोणत्याही प्रकाराचा धोका होणार नाही. तसंच खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पांढरा आणि निळा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: शारीरिक रूपातून मनस्थिती थकल्यासारखी जाणवेल. कुठल्याही कार्यात मन लागणार नाही. सहकाऱ्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा लागेल, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ रंग – पांढरा.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्या कामासाठी लाभदायक असेल. आरोग्य चांगले राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सरकारी कामांमध्ये यश मिळेल. शुभ रंग – पिवळा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आपली पत्नी आणि मुलांना वेळ द्या. जवळच्या प्रेमळ व्यक्तिशी भेट होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: न्यायालयीन कामांसाठी अनुकूल वातावरण असेल. मनात शंका आणि अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे शारीरिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. व्यवहारात संयम ठेवा. तुम्ही खूप उत्साहित असाल. खर्च वाढतील आणि गैरसमज होण्यापासून सावध रहा. शुभ रंग – पिवळा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आपल्या मित्रपरिवारांसोबत दिवस खूप उत्तम जाईल. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी आनंददायक ठरतील. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. धन लाभ होईल. दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. शुभ रंग – हिरवा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: सुरूवातीला कामात काही अडचणी येतील. पैशांच्या नियमित व्यवहारामुळे चिंता करण्याची गरज नाही. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ मिळू शकते. मित्रांना भेटून खूप प्रसन्नता वाटेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग – निळा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: चिंता करणं थोडं कमी करा. तुम्ही खूप भावुक व्हाल. साहित्य, लेखन आणि कलाक्षेत्रांमध्ये तुमचे कार्य लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली साथ मिळेल. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष्य ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग – लाल.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: इतरांशी व्यवहार करताना किंवा बोलताना लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. मुख्य म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवा, त्यासाठी मनशांती हा उत्तम मार्ग आहे. शुभ रंग – पिवळा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम