द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; बंगाल मधील दुर्गा देवीचा पंडाळ काही धर्मांधांनी पाडला त्याच्या निषेधार्ह त्रिपुरा येथे मोर्चा निघाला अन येथे देखील मशिदीवर दगडफेक झाल्याची घटना घडली , अन वाद निर्माण झाला. प्रार्थनास्थळाच्या वादावरून गेल्या शुक्रवारी मालेगाव येथे दंगल झाली होती. या दंगलीत भावना भडकवण्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केल्याचे समोर आले आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ `कुत्ता गोली`ची नशा करणारे टवाळखोर जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. आगामी काळात विना प्रिस्क्रीपशन अल्प्राझोलम (कुत्ता गोळी) विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मालेगाव मधील जमलेला जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दंगलीच्या तपासात पोलिसांनी याबाबत पाच गुन्हे दाखल केले होते. यासंदर्भात पोलिसांनी वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करणारे नगरसेवक अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल याला अटक केली आहे.
आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जनता दलाचे नगरसेवक मुश्तकीन डिग्नीटी यांचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान अय्याज हलचल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी जनता दलाशी झालेल्या महागठबंधनमध्ये प्रवेश केला. सध्या या महागठबंदनचे नेते आमदार मौलाना मुफ्ती `एसआयएम`पक्षात असून त्यांच्या नेतृत्वाखाली अय्याज काम करतो.
भावना भडकवण्याच्या नादात समाजातील एकोपा बिघडवणारे जनता दलाचे नेते व महापालिकेतील महागठबंदनचे महत्त्वाचे नेते, नगरसेवक मुश्तकीन डिग्सेनीटी यांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी अतिशय कठोर पावले उचचली आहेत. काही समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत अटक केलेल्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार आहेत.
मालेगाव मधील अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल (वय ४४) व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिस शिपाई नितेश खैरनार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक केल्याने दंगलीच्या मुळाशी जाण्यास पोलिसांनी मदत होईल.
माजी आमदार आसिफ शेख म्हणाले शहरातील हिंसक घटनांची सर्वंकष चौकशी करावी, यात राजकीय हस्तक्षेप असू शकतो, दिवसभर शांततापूर्ण बंद असताना दोन धर्मात अराजकता निर्माण करण्यासाठी काहींनी हा प्रयत्न केला तर नाही ना, याबाबतही चौकशी व्हावी.
राज्यात आगामी महापालिका व काही राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील वातावरण दुषीत करण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, याकडे लक्ष द्यावे. असे मत शेख यांनी व्यक्त केलं. सहारा हॉस्पिटल व शिवाजी पुतळ्यापुढील जुन्या महामार्गावर हिंसाचार करणाऱ्यांमध्ये कोण-कोण होते, त्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शहानिशा करावी. दोषींवर कारवाई करताना निर्दोष लोकांवर कारवाई झाल्यास विरोध करु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम