बॉलिवूड प्रतिनिधी :आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अर्थात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली.पॉर्न फिल्मची निर्मिती व वितरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आणि संपूर्ण बॉलिवूड हादरले .आज मुंबई पोलिसांनी शिल्पाचा जबाब नोंदवला, तेव्हा तिने यात पती राज हा निष्पाप असल्याचा दावा केला आहे.राज कुंद्रा अटकेत असला तरी त्याची बाजू मात्र शिल्पाने सोडलेली नाही.
माझा पती निर्दोष…
आज शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला. तेव्हा शिल्पाने सर्व आरोप खोटे असल्याचे नमूद केले. राजचा मेहुणा प्रदीप बक्षी हा अॅपचे काम पाहत होता,तसेच तो सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असल्याचे शिल्पाने म्हटले आहे. पॉर्नोग्राफी व अश्लील कंटेंट यातील फरक मोठा आहे यावर शिल्पाने बोट ठेवला . राज कुंद्रा पॉर्न फिल्मची निर्मिती करीत नसल्याचा दावा तिने केला आहे. हॉटशॉट्स अँप मधील कंटेंट काय होता, याची माहिती नसल्याचेही शिल्पाने म्हटले आहे. पती निर्दोष असल्याचा दावा तिने केला आहे.पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुंद्राने पोलीस कोठडी रद्द करण्याची याचिका…
राजने पोलिस कोठडी रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयात केली आहे. पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत ,ते अश्लील नसून विशिष्ट वर्गासाठी तयार केलेल्या लघुपट आहे, असा दावा त्याने केला आहे. मला झालेली अटक बेकायदा आहे , त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आलेली नाही . त्यामुळे महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली पोलीस कोठडीही बेकायदा आहे, असा दावा राज कुंद्राने केला आहे. त्यामुळे कुंद्राने आता पोलिसांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे.
कुंद्राने याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार माझ्या लावलेले आरोप चुकीचे आहेत. कोणतेही गैर कृत्य मी केलेले नसून .पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत, ते थेट अश्लील वर्तन अथवा अश्लील संबंध नाहीत. हा कंटेंट लघुपटाच्या माध्यमातून दाखविला आहे. मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे.
राज कुंद्रा व त्याचा साथीदार रायन थार्प यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले तर त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली असून, बॉलिवूड मधून मात्र कोणीही राज यांच्या बाजूने समोर आले नाहीत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम