प्रसाद बैरागी
निफाड/प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गेट रेल्वे फाटक अप आणि डाऊन दुरुस्तीसाठी ५ ते ८ डिसेंबर, २०२१ पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कुंदेवाडी रेल्वे फाटक रविवार दिनांक ५ डिसेंबरपासून ८ डिसेंबरपर्यंत अप-डाउन दोन्ही मार्ग दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. तरी येथून ये-जा करणाऱ्या परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम