द पॉईंट नाऊ ब्युरो : किरकोळ कारणाने झालेल्या वादातून एका तरुणाला थेट उकळत्या चुन्यात ढकलून दिल्याची घटना घडली आहे. सातारा येथील रविवार पेठेत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सातारा येथे राहत असलेला समाधान मोरे याला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण केली. त्यात समाधान याला उकळत्या चुन्याच्या देवळीत ढकलून देण्यात आले. यामुळे समाधान हा नऊ टक्के भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरुणाईमध्ये बदलती मानसिकता, किरकोळ कारणातून घेतल्या जाणाऱ्या टोकाच्या भूमिका अशा घटना दैनंदिन वाढू लागल्या आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम