काळाने केला घात! गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात तिघांचा मृत्यू 

0
16

जळगाव तालुक्यातील पळास खेड्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन गुरांना वाचवताना झाडावर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पळासखेडा येथून कारने तरवाडे गावाकडे भरधाव वेगात असताना अचानक येणाऱ्या गुरांना वाचवण्यासाठी गेले असताना, गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळली. ही चार चाकी झाडाला आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यात कारमधील किसन लखीचंद जाधव, पवन इंदल राठोड , जितेंद्र काशिनाथ पवार या तिघांच्या डोक्यास व हातापायाला जबर मार लागला. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here