द पॉईंट नाऊ ब्युरो : पूर्वी माहिती मिळवण्यासाठी पुस्तके वाचली जात मात्र आता काळ बदलला असून, जगात कोणतीही गोष्ट सर्च करायची असेल तर गुगल एकमेव पर्याय आहे. तरुणाईचे आयुष्य गुगलमुळे अगदी सोपं झालं आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या सर्च रिझल्टचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
भारतातील सर्च करणाऱ्या 75% महिला 15-34 वयोगटातील आहेत. याशिवाय गुगलवर मुली काय शोधतात हे जाणून घेणे तितकचं मजेशीर असणार आहे. मुली किंवा महिला रात्री एकांतात काय सर्च करतात याची उत्सुकता सर्व्यांनाच असते.
करियर संबंधित अनेक पर्याय
गुगलच्या रिपोर्टनुसार, मुली लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असतात, त्या आपल्या भविष्याच्या दृष्टीने करिअरला जास्त महत्त्व देतात. अशा मुली इंटरनेटवर यासंबंधीची वेगवेगळ्या माहिती शोधतात. ज्यामुळे कोणत्या क्षेत्रात आपल्याला फायदा होवू शकतो किंवा कोणता कोर्स केला पाहिजे. इत्यादी गोष्टी मुली गुगलवर सर्च करतात.
ऑनलाईन शॉपिंग सर्च
मुलगी म्हटलं की शॉपिंग हे अर्थात येणारच ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाईन, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबद्दल इंटरनेटवर जास्त सर्च करतात. अनेक संशोधनात ही बाब समोर आली आहे. यामुळे महिलावर्ग ऑनलाइन स्वरूपात देखील शॉपिंगला अनन्य साधारण महत्व देत असत.
ब्युटी टिप्ससाठी घेतात इंटरनेटची मदत
आपले सौंदर्य टिकून रहावे यासाठी मुलींना सुंदर आणि वेगळं दिसायला आवडतं. यासाठी त्या इंटरनेटची मदत घेतात. वेगवेगळ्या सेलिब्रेटींना फॉलो करत असतात, मुलींना फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय शोधायला जास्त आवडतात.
रोमँटिक गाण्यांची असते आवड
मुलींह्या गाण्यांचा आनंद घेत असतात सहसा प्रत्येकाला गाणी ऐकायला आवडतात. पण गुगलवर मुलींनी सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे संगीत. मुली इंटरनेटवर खूप रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक शायरी देखील शोधतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम