काय सांगता …! ; पूर्वीप्रमाणे घराघरात वाजणार टेलिफोनची रिंग ?

0
123

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तळागाळातील माणसे जोडणा-या माणसांची दखल घेवुन संपूर्ण जगाला जोडणा-या केंद्रसरकारच्या भारत संचार निगम लि.(बी.एस.एन.एल) या कंपनीच्या संचालक पदी अॕड. रविंद्र बोरावके यांची निवड झाल्यानंतर  पहिली बैठक दिल्ली येथे संपन्न झाली.  झालेल्या बैठकीनंतर श्री. बोरावके यांनी पञकारांशी बोलतांना सांगितले की,  संपुर्ण भारतात व भारता बाहेरही व्यवसाय असलेल्या या कंपनीचा खूप मोठा कारभार आहे.

अब्जावधी रूपये किंमतीच्या मालमत्ता आहेत. सर्वत्र टॉवर आहेत. इतर कंपन्यांनाही ते भाडेतत्वावर वापरावयास देण्यात येतात. भारतात जवळपास ७० टक्क लॅन्डलाईन टेलीफोन देणारी तसेच सर्वात जास्त व चांगली ब्रॉडबॅन्ड सेवा, वाय फाय सेवा देणारी बी.एस एन.एल ही अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील ग्रामीण भागात खेडोपाडीही मोबाईल सेवा फक्त बी.एस.एन एल चीच चांगल्या प्रकारची आहे.

टेलीफोन ,फायबर केबल, मोबाईल व इतर उपकरणे निर्मित करण्यासाठी पाच फॅक्टरीज आहेत ट्रेनिंग देणाया तीन इन्सीटयूटस आहेत.त्याचप्रमाणे देखभाल विभाग, संशोधन विभाग, ग्राहक विभाग मार्केटींग विभाग असे वेगवेगळया २४ विभागामार्फत कंपनीचे काम चालत असल्याचे श्री. बोरावके म्हणाले.

श्री. बोरावके पुढे बोलतांना म्हणाले की, मागील आठवडयातच नवी दिल्ली येथे कंपनीच्या आपल्या पहिल्या मिटींगमध्ये सहभाग घेऊन आल्यामुळे कामाची माहिती अॅड. बोरावके यांनी सांगितली. एकूण १२ सदस्यांचे संचालक मंडळ आहे त्यात सहा संचालक हे कंपनीच्या विविध विभागांवर काम करणारे उच्चस्तरीय अधिकारी आहेत. त्याशिवाय केंद्रसरकारच्या फायनान्स खात्याचे सेकेटरी व टेलीकॉम मंत्रालयाचे सेकेटरी असे दोन सदस्य आहेत. या प्रमाणे शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी आहेत. चार संचालक देशातील वेगवेगळया भागातील निवडले आहेत.

दिव- दमन येथील ‘तृप्ती पटेल’ या महिला सदस्या आहेत उत्तर प्रदेश मधून ‘मनोज चौधरी हे मेडिकल व्यवसायिक आहेत. आसाम मणिपुर येथिल — सिकोजाम किपगेम’ हे शिक्षण क्षेत्रातील सदस्य आहेत. महाराष्ट्रातून अॅड.रविंद्र बोरावके असे १२ संचालक आहेत.

मध्यंतरीच्या २००४ ते २०१४ या दहावर्षाच्या कालावधीत स्पर्धेच्या युगात २जी स्पेक्ट्रच्या घोटाळयामुळे व नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीची सेवा इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे पडली. परंतू आता पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात नवीन योजना आखल्या जात आहेत. घरगुती टेलीफोन सुध्दा उपग्रहाव्दारे जोडणी केली जाणार आहे त्यामुळे येत्या काही महिन्यातच पुर्वीप्रमाणेच घराघरात टेलीफोनची घंटा वाजू लागेल. व येत्या काही दिवसात कंपनी स्पर्धेत सर्वात पुढे आलेली दिसेल. असा विश्वासही श्री. बोरावके यांनी व्यक्त केला.

संपुर्ण देशातून आम्हा चार सदस्यांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. त्याबद्दल आभार मानले. त्यांनी दाखविलेला विश्वास व जबाबदारी पुर्ण निष्टेने व प्रामाणिकपणे पार पाडील अशी ग्वाही अॅड. रविकाका बोरावके यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here