द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सध्याच्या या अतिशय व्यस्त आणि वेगवान युगात आता अधिक वेगवान इंटरनेट सेवा देखील सुरू झाल्या आहेत. पुणे (Pune) शहरामध्ये 5G इंटरनेट (Internet)सेवेचं ट्रायल घेण्यात आलं.
कधीकाळी इंटरनेट म्हणजे अतिशय कुतूहल वाटणारी बाब होती. जी बहुधा अधिकतर कम्प्युटर वरच बघायला मिळायची.
मात्र कालांतराने सारं काही बदलत गेलं आणि इंटरनेट सेवा ही दैनंदिन गरज बनली.
इंटरनेटच्या क्रांतीने साऱ्या जगाला वेगवान आणि एकमेकांच्या जवळ केले आहे.
आधी 2G सेवा सुरू झाली. त्यात लोकांना ती अतिशय नवीन वाटायची. नंतर 3G सेवा आली. म्हणजे 2G पेक्षा वेगवान वेगवान इंटरनेट सेवा.
3G च्या क्रांतीने सर्वांना अतिशय वेगवान केले. नंतर 4G सुरू झाले. जे आता सर्वांच्याच अतिशय अंगवळणी पडले आहे.
4G इंटरनेट सुविधेने सर्वांना वेगवान कार्यासाठी, माहितीसाठी प्रवृत्त केले. जे सर्वांच्याच मोबाइल मध्ये आज उपलब्ध आहे.
आधी इंटरनेट साठीचा डेटा अतिशय महाग होता. ज्यात जवळपास सर्वच 1 GB डेटा सुद्धा महिनाभर वापरायचे.
मात्र इंटरनेट सेवा वेगवान झाली, तशी डेटा ची मागणी वाढली. सर्व कंपन्यांनी मग स्पर्धा निर्माण करत, कमी दरात अधिकाधिक डेटा उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली.
आता मात्र 4G देखील जुनं झालं आहे. कारण जगभरात 5G सेवा सुरू होऊ लागल्या आहेत. आणि भारतात देखील आता लवकरच दैनंदिन सुरू होतील.
याठीच कंपन्यांद्वारे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांचे 5G इंटरनेट सेवेचे ट्रायल सुरू आले.
याच अंतर्गत Vi या कंपनीने पुणे शहरात 5G इंटरनेट सेवेचे नुकतेच ट्रायल केले. ज्यास भन्नाट असा स्पीड मिळाला.
Vi कंपनीला मिळालेल्या परवानगी नुसार, वेगवेगळ्या गिगा हर्ट्झ वर वेगवेगळा स्पीड मिळाला.
3.5 GHz वर 1.5GBPS, 6 GHz वर 4.2 GBPS तर बँडसच्या बॅक हॉल वर 9.8 GBPS स्पीड मिळाला आहे.
यामुळे आता भारतीय नागरिकांना लवकरच 5G सेवेचा अनुभव घेता येणार आहे. यात शंका नाही.
या आधी Airtel कंपनीने देखील हैदराबाद (Hyderabad) मध्ये 5G इंटरनेट सेवेचे ट्रायल घेतले होते.
आता 5G सेवा सुरू होणार असली, तरी सर्व कंपन्यांनी मात्र आता इंटरनेट सेवांच्या पॅकेजेस चे दर नुकतेच वाढवले आहेत. तेही केवळ 4G सेवेसाठी.
आता 5G सेवा सुरू झाल्यावर काय दर असणार? याची देखील आता वाट पाहिली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम