काय सांगता? गॅस सिलिंडर मिळणार इतके स्वस्त! ; केवळ 633 रुपये

0
65

द पॉईंट नाऊ ब्युरो : गॅस सिलिंडर अनपेक्षित अशा दरात आता भेटणार आहे. तेही फक्त 633 रुपयांना. हो! तुम्ही ऐकताय ते खरच आहे.

इंडेन ही कंपनी आता ग्राहकांना केवळ 633 रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे. हे कंपोझिट सिलिंडर असणार आहे.ज्यात 10 किलो गॅस ग्राहकांना उपलब्ध होईल.

सध्या ही सेवा 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. आणि लवकरच ती सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल. असे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांना या महागाईच्या काळात यामुळे नक्कीच चांगला दिलासा मिळणार आहे.

सध्या इंधनाचे दर शंभरी पार आणि गॅस सिलिंडरचे दर  हे हजारीला जाऊन टेकलेत. त्यात इंडेन कंपणीद्वारे देण्यात आलेल्या या सुचनेमुळे ग्राहकांना नक्कीच हायसे वाटेल यात तिळमात्र शंका नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here