स्वप्नील अहिरे, आराई
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; आराई गावच्या सोयी-सुविधा सुसूत्रता व पदाधिकाऱ्यांचा समन्वय अलौकिक आहे. याप्रमाणेच इतर गावांनीही आदर्श घेऊन आपले गाव उत्कृष्ट करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश अमित कोष्टी यांनी केले.
‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुका विधी सेवा समिती, ग्रामपंचायत आराई व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कायदेविषयक शिबिर सांगता प्रसंगी रविवारी (ता.१४) ते बोलत होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश ए. जी. तांबोळी, बागलाणच्या उपसभापती ज्योती अहिरे, लोकनियुक्त सरपंच मनीषा अहिरे व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रासंगिक भाषणात ॲड. ए. एल. पाटील यांनी महिलांवरील अत्याचार व त्यावरील कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ॲड. दर्शना मोटवानी, रूपाली पंडित यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. ग्रामस्थांना अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम, सातबारा खरेदी- विक्री करताना घ्यावयाची काळजी, महिलांचे हक्क व अधिकार, महिला सशक्तीकरण, सबलीकरण महिला व बाल लैंगिक अत्याचार आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, तालुका समन्वयक सचिन चव्हाण, ॲड. विश्वास सोनवणे, अविनाश मोरे, दर्शना मोटवानी, न्यायालय लिपीक सार्थक कुलकर्णी, हेमंत देवरे, उपसरपंच अनिल माळी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधव अहिरे, डॉ. गोकुळ अहिरे, वसंत अहिरे, पंचायत समिती माजी उपसभापती परशुराम आहिरे, शिवसेना नेते दिलीप अहिरे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. भामरे, लिपीक स्वप्नील अहिरे, बचत गटाचे सरला अहिरे, योगिता अहिरे, सविता गायकवाड, प्रभाग संघ अध्यक्षा लता भोसले, वत्सला अहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी भारत अहिरे, वसंत भदाने, तुषार अहिरे, तेजस अहिरे, भाऊसाहेब अहिरे, गौतम गरुड, ललित महिरे, महिला बचत गटाच्या सर्व महिला आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम