कांचन किल्ल्यावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण

0
37

देवळा प्रतिनिधी : 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवळा तहसिल कार्यालयात आज “विविध कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुकयाचा मुख्य शासकिय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मा. श्री विजय सूर्यवंशी तहसिलदार देवळा यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमाच्या वेळी भारत देश स्वातंत्र होतांना स्वातंत्र चळवळीत योगदान दिलेले देवळा तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांचे वारसांना पुष्पगुच्छ देवुन सन्मानीत ‘ करण्यात आले.

सन 2021-22 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील कांचणे किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. सदर तिरंगा ध्वज फडकवितांना किल्ल्यावर मा. श्री विजय सूर्यवंशी तहसिलदार देवळा, मा. विजय बनसोडे नायब तहसिलदार देवळा, दिपक गवारे ,मनोज पडलवार महसुल सहाय्यक श्री अविनाश गावित तलाठी महालपाटणे, अंबादास पुरकर तलाठी लोहणेर, उमेश गोपनारायण तलाठी खर्डे, रोशन जाधव तलाठी कुंभार्डे, समाधान जाधव, जयेश मोरे कोतवाल, कुणाल शिरसाठ, ऑपरेटर इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच यावेळी कनकापुर येथील नागरीक, महेश मोरे, पांडुरंग पिंपळसे, समाधान वाघ, व खर्डे येथील नागरीक, भुषण जाधव, व कुणाल जाधव इत्यादी उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here