कांचणे येथून मोटारसायकलची चोरी ; देवळा पोलिसांत गुन्हा दाखल

0
27

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील अति दुर्गम अशा कांचणे ता देवळा येथील कैलास सुकदेव गांगुर्डे यांची मोटरायकल चोरीस गेली असून , अज्ञात आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अधिक माहिती अशी कि , खर्डे परिसरातील कांचणे येथील कैलास सुकदेव गांगुर्डे यांच्या मालकीची अंदाजे किंमत ६० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटार सायकल( क्रमांक एम एच ४१/बी एफ ९६१२ ) दि २० डिसेम्बर रोजी गांगुर्डे यांच्या राहत्या घराजवळून अज्ञात इसमाने चोरून नेली आहे .

या घटनेबाबत कैलास गांगुर्डे यांनी( दि १४) रोजी उशिरा देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार करीत आहेत .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here