रोहित गुरव
द पॉईंट नाऊ (ताहाराबाद) : आपल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान होणं ही अतिशय मोठी बाब असते. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग राज्य उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ताहाराबाद येथील शिवशक्ती आणि जोगेश्वरी ग्राम विकास शिक्षण संस्थेच्या वतीने स्वर्गीय दिलीपराव ठाकरे यांच्या 59 व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार मिलिंद चित्ते यांना प्रदान करण्यात आला. राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या मिलिंद चित्ते यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी साई शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अण्णासाहेब मगर होते. यासोबतच नाशिक जिल्हा भाजप उपाध्यक्ष तथा नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय भामरे, शिवशक्ती व जोगेश्वरी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस नंदलाल ठाकरे, संस्था संचालक अमोल ठाकरे, जि. प. सदस्य रेखा पवार यांचे पती माजी उपसरपंच यशवंत पवार, ग्रामपंचायत सदस्य निलेश कांकरिया, आर. एस. एस. संघटक बाळासाहेब ब्राम्हणकार, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भाऊदास महाले, नानासाहेब भामरे, कै. दिलीपराव यादवराव ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक देवरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम