स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : पुरणपोळी शिवाय कुठलाही सण, साजरा होत नाही. दोन वर्षापासुन सण उत्सव लग्नकार्यांवर कोरोनाचे सावट पसरले असुन शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक बजेटही दोन वर्षापासुन कोरोनामुळे कोलमडले आहे, पण सणाला येथील परिसरासह ग्रामीण भागात वयोवृध्द आजी मातीच्या खापरावरील पुरणपोळीला पसंती देत रेडीमेड पोळ्या बनवुन विक्रीस प्राधान्य देतात. मात्र ह्या वर्षी विक्रीत घट झाली असून मकर संक्रात सणाला महिलांनी घरीच पोळ्या बनविण्यास पसंती दिल्याचे चित्र दिसुन आले आहे.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील आता रेडीमेड पुरणपोळी तयार करून मिळत असल्यामुळे रेडीमेड पुरणपोळ्या घेण्याचा कल शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे. पूर्वी घरातील वृद्ध महिला पुरणपोळ्या करत असत. आज तरुण मुली देखील छान अशा पुरणपोळ्या करताना दिसतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक सणाला ग्रामीण भागात घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात असत. मात्र आता धावपळीच्या युगात व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना वेळ मिळत नाही. परिणामी रेडीमेड पुरणपोळ्या विकत घेऊन त्यात आनंद शोधला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात रेडिमेड पुरणपोळीची मागणी वाढली आहे. पहीले पुरणपोळी ३० ते ४० रूपयात मिळत असे परंतु यंदा महागाईमुळे ४५ ते ५० रुपयाला एक पुरणपोळी मिळते. अडीचशे ते तिनशे रुपये किलोने देखील पुरणपोळ्या तयार करून दिल्या जातात. पूर्वी मातीच्या चुलीवर पुरणपोळ्या केला जात असत. परंतु आता नवीन युगात गॅस शेगडीवर पुरणपोळ्या केल्या जातात. पुरणपोळ्यांचा आस्वाद घेण्यास काही तरी वेगळाच आनंद असतो. मात्र ह्या वर्षी कोरोनामुळे पुरणपोळी विक्रीत घट झाली असुन ग्रामीण भागात महिलांनी घरीच पुरण पोळ्या बनविण्यास ह्या सणाला पसंती दिली आहे
वारंवार होणारी वस्तूंची भाववाढ,इंधन दरवाढ, पुरणपोळीसाठी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारा थोडासा नफा तरी कधी नुकसान होत असते. एक पुरणपोळी ५० रुपयात विक्री केली जाते मात्र हया वर्षी कोरोनामुळे विक्रीत घट झाली आहे. –सुशिलाबाई वडगे -गृहणी मालेगाव सावता चौक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम