कळवणचे राजकारण ‘मनसे’ उमेदवाराने पालटले

0
45

कळवण प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे अस्तित्व नगण्य असतांना कळवणच्या राजकीय रंगमंचावरील चित्रच मनसेच्या उमेदवाराने पालटले आहे. नाशिक जिल्ह्यात मनसेचा एक उमेदवार विजयी झाला. अन त्या उमेदवाराची राज्यभर चर्चा झाली. कारण या साधारण उमेदवाराने एका बलाढ्य नेत्याचा भावी नगराध्यक्षचा पराभव केला आहे. यामुळे चर्चा तर होणारच.

जिल्ह्यातील कळवण नगरपंचायतीत विजयी झालेल्या मनसेचा चेतन मैद हा एक साधारण कार्यकर्ता आहे. त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र त्याने राजकारणात दबदबा असलेल्या सुनिल महाजन या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला तसेच नगरपंचायतीची सर्व राजकीय गणितेच बदलून टाकली. महाजन हे नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते. त्यांचा पराभव करणे तस शक्य नव्हते मात्र चेतन ने हे करून दाखवले व राजकारणात दमदार एन्ट्री घेतली.

कळवण नगरपंचायतीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग आठमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन मैंद यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुनील महाजन यांचा धक्कादायक पराभव केला. महाजन हे याच प्रभागाच्या नगरसेविका अनिता महाजन यांचे पती, तर कमको बँकेचे अध्यक्ष, कृउबाचे संचालक, कळवण एज्युकेशन संस्थेचे विश्‍वस्त आहेत, तर चेतन मैंद या कुठलाही राजकीय पूर्वानुभव नसलेल्या नवख्या युवा उमेदवाराने महाजन यांचा केलेला पराभव कळवण शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

मनसे विजयानंतर चेतन समोर अनेक आव्हाने असणार आहेत. यामुळे भविष्यातील राजकारणाचा चेतन बळी तर पडणार नाही न याची चर्चा सर्वत्र आहे, दिगगजांच्या उपस्थितीत वॉर्डाचा विकास करणे मोठे आवाहन चेतन समोर असणार आहे.

कळवण नगरपंचायतीत निवडून आल्यानंतर शनिवारी राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची माहिती ‘द पॉईंट नाऊ’ शी बोलतांना मैद यांनी दिली. कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य, जातीपातीच्या पलीकडील राजकारण याचा फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here