कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय जागतिक कर्करोग दिन साजरा

0
32

देवळा प्रतिनिधी : जागतिक कर्करोग दिनानिमित्त एन.सी.डी विभाग, ग्रामीण रुग्णालय देवळा व कर्मवीर रामरावजी आहेर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.(४) रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एम.अहिरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डी.डी.आहेर यांनी केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोगाची लक्षणे, कारणे, निदान व उपचार पद्धती याबाबत उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व एन सी डी विभागाचे समुदेशक शिवाजी गांजे यांनी कर्करोग व कर्करोगाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच कर्करोगाबाबत समाजामध्ये जनजागृती व कर्करोग नियंत्रणामध्ये युवकांची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे एनएसएस अधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डी.के.आहेर यांनी कर्करोग या आजाराबद्दल उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे शेवटी प्रा.यु.के.शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे, वैद्यकिय अधिकारी डॉ प्रदीप बच्छाव, समुपदेशक श्री शिवाजी गांजे, परिचारिका प्रतिभा आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आहेर, एनएसएस अधिकारी प्रा.डी.के.आहेर, पर्यवेक्षक प्रा.डी.डी.आहेर व इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here