कर्मवीर काकासाहेबांनी महाराष्ट्रातील कारखान्यांचे नेतृत्व केले – खा. पवार

0
24

देविदास बैरागी निफाड
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ; नाशिक जिल्ह्यात राज्याचे नेतृत्व करायचे,कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी सर्व महाराष्ट्रातील कारखान्याचे नेतृत्व केले आहे, तडजोड न करणारे व्यक्तिमत्व होते. दिलीप बनकर यांनी बंद असलेला कारखाना चालू करण्याचे शिवधनुष्य पेलले, देशात सहकारी साखर कारखाने आपल्या राज्यात सुरू करण्यात आले, साखर सोबत इतरही उत्पादने करावे लागतात, यापुढे वीजही तयार करावी, इथेनॉल तयार करावे, अमेरिका सारख्या देशात इथेनॉल वर वाहने चालतात. असे मत खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.

ऊसापासून दर टणला 200 रु जास्त मिळतील, हायड्रोजन, वीज, इथेनॉल व साखर हे उत्पादन करावे लागतील.

साखर कारखाना हा धंदा आहे, तो चालवण्याससाठी बनकर यांच्या मागे उभे राहावे लागेल. उसाचे उत्पादन वाढावे, कमीत कमी पाण्यात उत्पादन करावे लागेल, उस पिकाकडे द्राक्ष पिकाकडे लक्ष द्यावे, ब्राझील व थायलंड ऊस कमी त्यामुळे जगाला साखर पुरवायची जबाबदारी आता देशाची आहे, त्याचा लाभ करून घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले.

दर्जेदार ऊस व उतारा असेल तर भाव मिळू शकतो, वसंतदादा शुगर चे तज्ञ रानवडला दिले त्यांनी मार्गदर्शन केले, रानवड 3 हजार टनांपर्यंत न्यावा लागेल, ब्राझील 35 हजार टन उत्पादन काढतात तिथे 100 कामगार काम करतात ,त्यामुळे भरमसाठ कामगार भरती करा उत्तम पगार द्या, कामगारांनी संघर्ष तुटे पर्यंत तानु नये.

निफाड साखर कारखानासाठी मी संबधित लोकांना भेट देऊन चर्चा करणार व मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.प

अशोकराव बनकर नागरी पतसंस्था पिंपळगाव बसवन्त संचालित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 39 वा गळीत हंगाम शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते रानवड ता निफाड येथे संपन्न झाला त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिक कोकाटे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नीतीन पवार, शेखर गायकवाड ,रासाकाचे प्रवर्तक आमदार दिलीप बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात कारखान्याचे प्रवर्तक आमदार दिलीप बनकर म्हणाले की, सत्ता संघर्षाच्या लढाईत जिद्द चिकाटीने रासाका सुरू करण्याचा प्रयत्न केला, अजित दादांनी कारखाना सुरू करण्याचा शब्द दिला तो पूर्ण केला, कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी कारखाने सुरू केले, 6 वर्षांपासून कारखाना बंद आहे, कै गोपीनाथ मुंडे व हरिभाऊ बागडे यांनी 10 वर्ष कारखाना चालवला पण शेतकरी व कामगार यांचे पैसे थकवले.

कारखाना बंद असल्याने हलाखीची परिस्थिती निर्माण झाली स्व अशोकराव बनकर संस्थेच्या वतीने हा कारखाना चालवायला घेतला,1250 टन असलेला कारखाना चालवायची हिंमत केली आहे, इथेनॉल व त्यासारखे उपवस्तू निर्मिती करून मेळ जमावणार आहे. उपसा जलसिंचन योजना कर्जाच्या बोज्यात आहे, 80 कर्मवीर बंधारे नूतनीकरण, नांदूरमध्यमेश्वर बंधारा 10 गेट नवीन तयार करणे, ओझर शिर्डी रस्ता, शेतकऱ्यासाठी दिवसा 12 तास वीज द्या ,द्राक्ष निर्यातीचे अनुदान ,2 लाख पुढीव शेती कर्जात 50 हजार रु देणे, एच ए एल कारखाना कर्मचाऱ्यांना वर्कलोड द्यावा,

कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रधानमंत्री आवास योजना उपक्रमासाठी पवार यांनी केंद्र सरकारशी संवाद साधून महाविकास आघाडीला सहकार्य करावे अशी मागणी केली, पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खासदार पवार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून 39 व्या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकार कारखाने विकायला सुरू केले आहे असे असताना रानवड कारखाना सुरू होतोय. यावेळी श्रीराम शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

भुजबळांनी लगावला कंगनाला टोला 

कर्मवीर वाघ यांना पद्मश्री मिळाला होता पण आज कुणालाही पद्मश्री मिळायला लागला. ज्यांना इतिहास माहीत नाही. अशा लोकांना दिला जातो असा टोला भुजबळ यांनी कंगना राणावत यांना लगावला, व आमदार दिलीप बनकर यांनी’ हारी हुई बाजी पलटवली आणि कारखाना सुरू केला’ असे गौरवोद्गार काढले.

या सोहळ्याला तुषार शेवाळे, नीलिमा पवार, राजेंद्र डोखळे, माणिकराव बोरस्ते, सुरेशबाबा पाटील, सुवर्णा जगताप, अरविंद कारे, श्रीराम शेटे, तानाजी बनकर, दीपक बोरस्ते, सुभाष कराड, रमेशचंद्र घुगे, सुरेश कमांनकर, सचिन पिंगळे, रामभाऊ माळोदे,अजिंक्य गीते, पंढरीनाथ थोरे, डी के जगताप,अलका बनकर, राजाभाऊ शेलार, दत्तात्रय पाटील, शिवाजी ढेपले, आदींसह शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांनी आभार मानले.

 

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here