द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच ३% (DA ) महागाई भत्ता वाढवून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह आता केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी इतर कर्मचाऱ्यांना किमान वेतन कर्मचारी यांना मोठी भेट दिली आहे. आता कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यातही वाढ झाली आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली आहे. त्याचा लाभ १ ऑक्टोबर २०२१ पासून उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय कर्मचार्यांच्या परिवर्तनीय महागाई भत्त्यातील वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होईल. या अंतर्गत आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर महिन्याला परिवर्तनीय महागाई भत्ता (व्हेरिएबल डीए) मिळेल. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाची ठरणार आहे.
आता किमान वेतनही वाढेल
या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही वाढ होणार आहे, ज्यामुळे त्यांना या महामारीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. पगारातील ही वाढ १ ऑक्टोबर २०१२ पासून लागू होणार आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही दीड वर्षांसाठी फ्रीज डीएचा लाभ मिळत होता. पूर्वीच्या १७ टक्क्यांवरून २८ टक्के वाढ केल्यानंतर, ३ टक्के डीए वाढल्याने एकूण डीए ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार, रेल्वे, खाणकाम, तेल क्षेत्र, बंदरे आणि केंद्र सरकारच्या इतर कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सुमारे दीड कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासोबतच करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बदलत्या महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. म्हणजेच सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम