कर्नाटकात हिजाब – भगवीशाल वाद शिगेला ; महाविद्यालयांवर दगडफेक , तीन दिवस सुट्टी जाहीर

0
22

द पॉईंट नाऊ ब्युरो : कर्नाटकात सध्या असंतोष पसरला असून धर्मांध एकमेकात भिडले आहेत, हिजाब-भगव्या शालीच्या वादात विविध भागात हिंसक वळण लागल्याने, शिवमोग्गा येथे मंगळवारी दोन दिवस CRPC, कलम 144 अंतर्गत आदेश लागू करण्यात आले आहेत. यामुळे राज्यात धार्मिक तेढ वाढला असून त्याचे पडसाद इतर राज्यात वेगाने पसरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवमोग्गा शहरातील बापूजीनगर येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयावर काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आहे त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आंदोलन कर्त्यांनी मागणी केली की भगवी शाल घालून वर्गात जाण्याची परवानगी द्यावी किंवा हिजाब घालण्यास बंदी घालावी या मागणीसाठी महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन करत होते.

यावेळी काही आंदोलकांनी कॉलेजवर दगडफेक केल्याची माहिती आहे, काही जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना तेथील जिल्हा मॅकगन रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवमोग्गा शहरात 9 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहतील असे पोलिसांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटकात हिजाबचा वाद पेटला असून. एकीकडे हिजाब हा आमचा हक्क आहे म्हणत मुस्लीम विद्यार्थी लढत आहेत तर दुसरीकडे भगवी शाल घालूनही विद्यार्थी येत आहेत. न्यायालयाने हिजाब घालण्याचा आदेश दिल्यास आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा भगवी शाल परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयांमधील गणवेशाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुढे बोलताना मंत्री अश्वथ नारायण म्हणाले की, सरकारने हिजाबच्या मुद्द्यावर आधीच निर्णय घेतला आहे. मात्र, परिस्थिती गंभीर आहे. यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यभरातील सर्व हायस्कूल, पीयू कॉलेज, डिग्री कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजना पुढील तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून त्यांच्या शाळा-कॉलेजला 3 दिवसांच्या सुट्ट्या दिल्या आहेत आणि शांततेचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण मंडळ आणि गव्हर्निंग कौन्सिलने राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

1 ली ते 7 वी पर्यंत शाळा सुरु राहणार :

फक्त 3 दिवस हायस्कूल-कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र पहिली ते सातवीपर्यंत शाळा नेहमीप्रमाणे चालणार आहे.

उद्या दुपारी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सीएम बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, ते विविध जिल्ह्यांतील परिस्थितीबाबत मंत्र्यांशी चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती प्रभारी मंत्र्यांकडून गोळा केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here