कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे उमराण्यात दहन

0
50
उमराणे येथे कर्नाटक येथील मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करतांना नंदन देवरे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली . या घटनेचा संपूर्ण राज्यासह जिल्हाभरात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे.

उमराणे येथे कर्नाटक येथील मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करतांना नंदन देवरे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

या पार्श्वभूमीवर उमराणे येथील छत्रपती संभाजी राजे चौकात जाणता राजा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने कर्नाटक मध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारक विटंबनेचा जाहीर निषेध करण्यात येउन समाज द्रोही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here