खामखेडा प्रतिनिधी : खामखेडा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून खामखेडा,सावकी,पिळकोस गावांना वीज पुरवठा करण्यात येतो.सध्या विहिरींची पाणीपातळी चांगली असल्याने रबी पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे.यामुळे रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहेत. मात्र, महावितरण कंपनीकडून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वाफयात देखील पाणी पोचत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून
शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने आज खामखेडा येथील विद्युत रोहित्रानेच पेट घेतला आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत पंप जळत असल्याने पिके वाया तर जात आहेतच, शिवाय विद्युत पंप दुरुस्तीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
खामखेडा परिसरात 15 ते 20 दिवसांपासून कृषिपंपासाठी जो वीजपुरवठा केला जात आहे.तो अत्यंत कमी दाबाचा असल्याने परिसरातील शेतकर्यांच्या कृषिपंपात बिघाड होऊन ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांकडून महागडी कांद्याची रोपे आणून कांद्याची लागवड केली आहे.आणि त्यात वीज वितरण कंपनीकडून विजेच्या वेळेतही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
महावितरण कंपनीने शेतकर्यांची कांदा लागवडीच्या वेळेस सक्तीची वीजबिलाची वसुली केली होती.प्रत्येक कृषीपंप ग्राहकाकडून दहा ते पंधरा हजार विज बिल भरून घेतले आहे.मात्र सध्या खामखेडा सब डिव्हिजन अंतर्गत कृषिपंपांना अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. असल्याने वाफ्यात देखील पाणी जात नाही. त्यातच खामखेडा गावातील लायकेश्वर शिवारातील शेतकऱ्यांना विजच पुरत नसल्याने फक्त दिवसा चार तास वीजपुरवठा होत असून पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.दिवसा असलेल्या विजेच्या वेळेत वाफ्यातहि पाणी जात नाही तोच लाईट ट्रीपिंग घेत असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने, परिसरातील शेतकरी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने आज खामखेडा शिवारातील विद्युत रोहित्र पेट घेतला. रोहित्रा जवळ कोणी नसल्यामुळे सर्वच पिके हिरवि असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले. दिवसा मिळणाऱ्या वेळेत सध्या वाफ्यात हि पाणी पोहचत नसल्याची परस्थिती आहे. परिसरातील शंभरच्या ट्रान्सफॉर्मरवर कशीबशी 10 अश्वशक्तीचे दोनतीन कृषिपंप चालत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम